Home

सी.आय.डी.कार्यालय,संगम पूल पुणे येथे गुहेवरती बसविलेला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा ब्रांझचा अर्धपुतळा.
स्मारकाखाली असलेल्या गुहेमध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची भित्तीशिल्पे.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना त्याकाळी ठेवण्यात आलेली कोठडी. या स्मृती-कोठडीच्या दारांत सर्व मान्यवर.
स्मृती-कोठडीत - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वहस्तलिखित एकमुखी दत्ताच्या पोथीची प्रत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून अर्पण
पेरुगेट भावेस्कूल पुणे येथील भित्तीशिल्प अनावरण सोहळ्याप्रसंगी म.ए.सो.चे अध्यक्ष एअरमार्शल श्री.भूषण गोखले दीपप्रज्वलन करतांना-
पेरुगेट भावेस्कूल येथे बसविण्यात आलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वा.प्र.भावे,आणि ल.ना.इंदापूरकर यांचे भव्य भित्तीशिल्प.
भित्तीशिल्प अनावरण सोहळ्याप्रसंगी फडके स्नेहवर्धिनीचे अध्यक्ष प्रा.दि.गो.फडके व म.eए.सो.चे अध्यक्ष एअरमार्शल श्री.भूषण गोखले यांच्यासमवेत म.eए.सो.चे सर्व मान्यवर.
जागतिक चित्पावन महासंमेलनांतर्गत पहिल्या फडके कुल-संमेलनांत फडके स्नेहवर्धिनीचे मान्यवर.
२४-१२-२०११ रोजी पुण्यात संकल्प कार्यालयात संपन्न झालेल्या दुस-या कुलसंमेलनात दिंडीसाठी सज्ज असलेली भगवान परशुराम व फडके कुलवृत्तांताची पालखी.
रविवार दिनांक ३१-०५-२०१५ रोजी तिसरे फडके कुलसंमेलन रौप्यमहोत्सवी वर्षी मुंबईमध्ये चेंबूर येथे संपन्न झाले.
मुंबईमध्ये चेंबूर येथे तिस-या कुलसंमेलनात रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करताना फडके स्नेहवर्धिनीचे मान्यवर.

आवाहन – सर्व चित्पावन फडके कुलीनांनी फडके स्नेहवर्धिनी, पुणे संस्थेचे सभासद व्हावे.


चित्पावन फडके मंडळींचे संघटन करून एकमेकांतील स्नेहभाव वाढवावा व त्यातूनच समाजोपयोगी विधायक व हितकर कार्यक्रम राबवावेत या विचारांनी प्रेरित होऊन फडके कुलातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी वर्षप्रतिपदेच्या सुमुहुर्तावर दि. 27 मार्च 1990 रोजी ”फडके स्नेहवर्धिनी” या संस्थेची स्थापना केली. व प्रचलित कायद्यानुसार संस्थेची ऑक्टोबर / नोव्हेंबर 1995 मधे नोंदणी झाली. त्यानंतर ‘नियम व नियमावली” तयार करण्यात आली.
संस्थेचे ध्येय व उद्देश :-
1) चित्पावन फडके कुलातील मंडळींचे संघटन व स्नेहसंवर्धन करणे.
2) चित्पावन फडके कुलातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उन्नती करण्यास सहाय्य करणे.
3) फडके कुलवृत्तांतातील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी यथाशक्ती मदत करणे.

Type in
Details available only for Indian languages
Settings Settings reset
Help
Indian language typing help
View Detailed Help