About Us

आमच्या विषयी

चित्पावन फडके मंडळींचे संघटन करून एकमेकांतील स्नेहभाव वाढवावा व त्यातूनच समाजोपयोगी विधायक व हितकर कार्यक्रम राबवावेत या विचारांनी प्रेरित होऊन फडके कुलातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी वर्षप्रतिपदेच्या सुमुहुर्तावर दि. २७ मार्च १९९० रोजी ”फडके स्नेहवर्धिनी” या संस्थेची स्थापना केली व प्रचलित कायद्यानुसार संस्थेची ऑक्टोबर / नोव्हेंबर 1995 मधे नोंदणी झाली. त्यानंतर ‘नियम व नियमावली” तयार करण्यात आली.
संस्थेचे ध्येय व उद्देश :-
1) चित्पावन फडके कुलातील मंडळींचे संघटन व स्नेहसंवर्धन करणे.
2) चित्पावन फडके कुलातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उन्नती करण्यास सहाय्य करणे.
3) फडके कुलवृत्तांतातील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी यथाशक्ती मदत करणे.

यासाठी ‘फडके स्नेहवर्धिनी’तर्फे पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
1) कोजागिरी पौर्णिमेच्या सुमारास होणार्‍या कार्यक्रमात हुशार विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच गुणवंत युवा कलाकारांचे कौतुक करण्यात येते. त्यांना रोख रक्कमा व स्मृतिचिन्ह देण्यात येते.
2) डिसेंबर/जानेवारी मध्ये होणार्‍या स्नेहसंमेलन प्रसंगी अमृतवयीन फडकेकुलीन व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. त्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. यावेळी गायन, वाद्यवादन, कथाकथन असे मनोरंजनाचे कार्यक्रम देखिल आयोजित केले जातात.
3) गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते.
4) फडकेकुलीन विद्यार्थ्यांसाठी प्रसंगोपात् मार्गदर्शनपर मेळावे घेण्यात येतात.
5) जून/जुलैमध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात येते.
6) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची जयंती 4 नोव्हेंबर रोजी व पुण्यतिथी 17 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. पुण्यात संगम पुलाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रांगणात, वासुदेव बळवंत यांचा अर्धपुतळा व तेथील गुहेत त्यांच्या जीवनातील प्रसंगावर भित्तिशिल्पे बसविली आहेत. हे काम फडके स्नेहवर्धिनीने सर्व समाजाच्या सहभागाने पार पाडले.
7) राष्ट्रीय पातळीवरील आवाहनानुसार कारगिल निधी, भूकंपग्रस्त सहाय्य निधी, यांसारखे निधी वेळ्प्रसंगी जमा केले जातात व योग्य ठिकाणी पाठवले जातात.
सभासद संख्या –
सभासदांच्या तीन श्रेणी असून 31 मार्च 2016 अखेर सदस्य संख्या खालीलप्रमाणे आहे.
1) सन्मानीय सभासद : 1
2) आश्रयदाता सभासद : 36
3) आजीव सभासद : 418
—————————-
एकूण संख्या – 454
—————————-
सभासद शुल्क :- चित्पावन फडके कुलातील व्यक्ती व फडके कुलातील माहेरवाशीणी यांना सभासद होता येते. सभासदत्वाची वर्गणी खालीलप्रमाणे आहे.
अ) आश्रयदाता सभासद :- एकदाच रू. 2000/-
ब) आजीव सभासद :- एकदाच रु. 1000/-
( वरील सभासद वर्गणी सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे दिनांक 7 जुलै 2013 पासून लागू करण्यांत आलेली आहे. )
नवीन सभासदत्वाचे आवेदनपत्र स्वीकारताना आजीव सदस्य व्हावे असे आवाहन केले जाते.
कार्यकारी मंडळ :- संस्थेच्या दैनंदिन कारभारासाठी 11 सभासदांची निवड दर तीन वर्षांनी निवड्णुकीने केली जाते. कार्यकारी मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह व कोषाधिकारी हे पाच पदाधिकारी व सहा सभासद असतात. कार्यकारी मंडळाच्या सभा दरमहा घेतल्या जातात.
संस्थेच्या आर्थिक बाबी :-
आश्रयदाता व आजीव सभासद यांच्या शुल्कांच्या रकमा मुदत ठेवीत ठेवल्या जातात व त्यावरील व्याजातून खर्च केला जातो. संस्थेचा कायम निधी रू.लाखावर झाला आहे. विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी स्वतंत्र निधी असून त्यावरील फक्त व्याजाची रक्कम सहाय्यार्थ दिली जाते. दरवर्षी संस्थेच्या जमा खर्चाचे लेखापरीक्षण सनदी लेखापालाकडून करण्यात येते.

दिनांक 23 डिसेंबर 2007 रोजी पुण्यात संपन्न झालेल्या चित्पावन महासंमेलनंतर्गत फडके कुलीनांचे संमेलन आयोजित करण्यात ‘फडके स्नेहवर्धिनी’ने पुढाकार घेतला होता व त्यावेळी जवळजवळ 625 फडके कुलबंधु भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेले होते.

Type in
Details available only for Indian languages
Settings Settings reset
Help
Indian language typing help
View Detailed Help