कुलवार्ता

Title 1कुलसंमेलन-२ Title 3Title 4
Kulsammelan 1

कुलसंमेलन-२

फडके कुल संमेलन – २४ डिसेंबर २०११.
शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०११ रोजी फडके कुलाचे संमेलन ‘ संकल्प कार्यालय ‘ पुणे येथे साजरे झाले.
यांत पुण्यातील १६४ व परगांवचे ३६ अशा २०० कुल बंधू -भगिनी यांनी भाग घेतला. ईशस्तवन झाल्यावर
भगवान परशुराम व कुल वृत्तांताची पालखीतून दिंडी काढण्यात आली. यांत बऱ्याच कुल बंधू व कुल भगिनी
यांनी उत्साहाने भाग घेतला.
यांत कार्यवाह श्री. दत्तात्रय लक्ष्मण यांनी सर्वांचे स्वागत केल्यावर ‘फडके स्नेहवर्धिनी ‘
या संस्थेची माहिती व आतापर्यंतची वाटचाल याबद्दल माहिती दिली. त्यानंतर अध्यक्ष प्रा. दिगंबर गोपाळ यांनी
कार्यकारी मंडळाची ओळख करून दिली. यानंतर विशेष कार्य केलेल्या खालील फडके कुलबंधूंचा सत्कार
फडके स्नेहवर्धिनीचे अध्यक्ष प्रा. दिगंबर गोपाळ यांचे हस्ते करण्यात आले.

1) डॉ. ब. गो. फडके – संस्थेचे सलग 18 वर्षे अध्यक्षपद भूषविले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत
यांचे स्मारकासाठी भरीव कामगिरी केली.
2) श्री. राजीवलोचन श्रीपाद फडके – संगणकीय क्षेत्रात बहुमोल संशोधन केले.
3) डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम फडके – मधुमक्षिका संशोधनांत अमूल्य कामगिरी, तसेच त्यासंबंधीचे प्रशिक्षण,
विस्तार ह्याबाबत निरनिराळ्या संस्थांशी बांधिलकी.
4) श्री. नारायण बाळकृष्ण फडके – सिने सृष्टीशी संबंधित आगळा छंद जोपासला. दुर्मिळ छायाचित्रे आणि
अनेक महनीय व्यक्तिंच्या स्वाक्षर्‍या त्यांनी गोळा केल्या.
5) श्री. कुणाल राजेंद्र – नृत्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी. डान्स कोरिओग्राफर म्हणून ख्यातनाम
2010 मध्ये पोलंड येथे आंतरदेशीय डान्स फेस्टिवलमध्ये सहभाग.
6) परिमल फडके – शास्त्रीय पद्धतीने नृत्यात प्राविण्य व पुणे फेस्टिवल कार्यक्रमांत सहभाग.
7) श्री. चंद्रकांत फडके – फडके स्नेहवर्धिनी वेब साईट निर्माण करण्यांत बहुमोल कार्य.
8) श्री. प्रसाद शिरगांवकर – श्री. शिरगांवकर यांनी परिश्रम घेऊन स्नेहवर्धिनीची वेबसाईट तयार केली.
श्री. शिरगांवकर (संचालक आदिवेब, वेबसाईट निर्माते) यांचा सत्कार करण्यांत आला.
त्यानंतर अध्यक्षांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नंतर या वेबसाईटचे श्री. राजीवलोचन फडके यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर श्री. बंडा जोशी यांनी विनोदी कार्यक्रम सादर केला. श्री. कुणाल व श्री. परिमल फडके यांनी नृत्याने सर्वांचे मनोरंजन केले.
स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Kulsammelan 3
Kulsammelan 4
Type in
Details available only for Indian languages
Settings Settings reset
Help
Indian language typing help
View Detailed Help