नियमावली

नियमावली

फडके स्नेहवर्धिनी या संस्थेचे नियम व नियमावली पुढे देण्यात आली आहे.

(1) नियमावलीतील शब्दांची संख्या(2) कार्यक्षेत्र(3) हिशोबाचे वर्ष(4) सभासदत्व व त्यांच्या नोंदणीची पद्धत(5) सभासदांचे प्रकार
1.1 नियमावलीत जेथे जेथे खालीलप्रमाणे शब्दप्रयोग आले असतील तेथे तेथे त्यापुढे
दर्शवल्याप्रमाणे अर्थ घ्यावयचा आहे.
1) संस्था/संघटना – फडके स्नेहवर्धिनी.
2) सभासद – घटनेनुसार व नियमानुसार झालेले संस्थेचे सभासद.
3) सज्ञान – सज्ञान कायद्यान्वये ठरविलेली वयोमर्यादा पुरी करणारा.
4) साधारण सभा – संस्थेची सर्वसाधारण सभा.
5) अध्यक्ष – संस्थेच्या सर्वसाधारण सभेने निवड केलेले अध्यक्ष.
6) कार्यवाह – संस्थेच्या सर्वसाधारण सभेने निवड केलेले कार्यवाह.
2.1 संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत राहील. मात्र सध्या फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये काम चालू राहील.
3.1 संस्थेचे आर्थिक वर्ष दिनांक 1(एक)एप्रिल ते 31(एकतीस)मार्च असे राहील. यावर्षाप्रमाणे
संस्थेची वार्षिक हिशेबपत्रके, निधीपत्रके, इ. तयार करून संस्थेच्या हिशेब तपासनीसांकडून मुदतीत
तपासून घ्यावयाची जबाबदारी पदाधिकार्‍यांची राहील.
4.1 चित्पावन फडके कुलातील कोणाही सज्ञान व्यक्तीला संस्थेचे सभासद होता येईल. अशा व्यक्तीला ध्येय व उद्देश मान्य असले पाहिजेत. फडके कुलातील माहेरवाशीणही सभासद होऊ शकेल.
4.2 सभासद होऊ इच्छिणार्‍या व्यक्तीस संस्थेच्या विहीत नमुन्यामध्ये सभासदत्वाचा अर्ज करावा लगेल.
महिन्याच्या कोणत्याही दिवशी त्यास अर्ज करता येईल. मात्र अशा व्यक्तीने अर्जासोबत त्या
महिन्याच्या एक तारखेपासून पुढे येणार्‍या 31 मार्च पर्यंतच्या कालावधीची हिशोबाने येईल ती वर्गणी,
आगाऊ दिली पाहिजे.
4.3 संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्याप्रमाणे अशा व्यक्तीचे सभासदत्व सुरू होईल व
त्याचे नाव सभासद पटावर घेतले जाईल.
4.4 खालील कारणास्तव कोणाही व्यक्तीस सभासद करून घेतले जाणार नाही.
(अ) नादार ठरविण्यात आलेली व्यक्ती.
(ब) मानसिक विकृत अशी व्यक्ती.
(क) नैतिक अध:पतन व गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याबद्दल फौजदारी खटल्यात शिक्षा झालेली व्यक्ती.
5.1 सन्माननीय सभासद _ संस्थेच्या कार्यकारी मंडळाने शिफारस केलेली व सर्व साधारण सभेने संमती
दिलेली फडके कुलातील कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेली व्यक्ती.
5.2 आश्रयदाता सभासद संस्थेला एकरकमी कमीत कमी रु.1500/-(रुपये एक हजार पाचशे मात्र) देणगी
देणारी फडके कुलातील व्यक्ती.
5.3 आजीव सभासद – संस्थेला एकरकमी रु.500/-(रुपये पाचशे मात्र) देणगी देणारी फडके कुलातील
व्यक्ती.
5.4 साधारण सभासद – वार्षिक वर्गणी रुपये 100/-(रुपये शंभर मात्र) नियमितपणे आगाऊ देणारी फडके
कुलातील व्यक्ती.
टीप :- वर्गणीचे वर्ष आर्थिक वर्षाप्रमाणेच राहील.
Type in
Details available only for Indian languages
Settings Settings reset
Help
Indian language typing help
View Detailed Help